Marathi Ukhane for Male

Romantic Marathi Ukhane for Male (Groom)

> काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.

> लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, ….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

> कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

> जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

> सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप

> संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

> चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

> दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

> मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

> पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

> श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

> मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

> पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

> सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.

> टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

> निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.

> रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.

> ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

> अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

> निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

> उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी,

> कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.

> जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,

> हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.

> सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

> लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.

> जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.

> उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.

> तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल

> प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

> मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.

> निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

> चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

> वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा सुंदर,

> मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

> राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,

> जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

> जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,

> जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.

> हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.

> चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

> काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात

> रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

> सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.

> आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, … चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.

> … माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.

> मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.

> आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

> पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, … ला आवडते नेहमी दुधावरची साय,

> संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.

> नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.

> रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.

> पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

> हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

> मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.

> शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.

> नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, .. चे रुप आहे अत्यंत देखणे.

> बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.

> ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.

> देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.

> देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी.

> स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,

> काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.

> अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

> देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

> श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, … ला सुखात ठेवीन हा माझी पण.

> नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.

> नंदनवनात अमृताचे कलश, … आहे माझी खुप सालस.

> देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन,

> हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.

> आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.

> आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.

> श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.

> हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे….मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे

> फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, ...च्या रूपाने झालो मी बेभान

> तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो ….ची लाल ओढणी

> दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात...च्या संग

> झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी, शोभून दिसते ….आणि माझी जोडी

> मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने...च्या  प्रेमात पडतं

> डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,....माझी झाल्यापासून जळतात सारी

> गुलाबाचे फूल मोहक आणि ताजे,...च्या येण्याने भाग्य उजळले माझे

> सोन्याच्या कपावर चांदीची बशी...समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी

> चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती, ...मुळे माझे सारे श्रम हरती

> मधाची गोडी, फुलाचा सुगंध,...मुळे कळला मला जीवनाचा आनंद

> प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी, ...माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली

> पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, ...मुळे झाले जीवन सुगंधी

> गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप, ….वर आहे माझं प्रेम खूप खूप खूप

> गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद,...च्या नावातच आहे सारा माझा आनंद

> आपल्याकडे सर्वांनी राखावा मराठी भाषेचा मान, ….चं नाव घेतो ऐका लक्ष देऊन कान

> नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,.....चे रूप आहे अत्यंत देखणे

> पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,....चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले

> निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे …. च नाव घेतो, लक्ष द्या सारे

> आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे …. च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे

> आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा …. च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!

> प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल….च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

> प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार, .... सारखा हिरा

> एका वर्षात, महिने असतात बारा…. मुळे वाढलाय, आनंद सारा!

> ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा….मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा

> गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा….च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

> लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …. आल्यापासून  झालंय, आयुष्य खूपच मस्त !

> .....माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल

> ....च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,....ला पाहून, पडली माझी विकेट !

> दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात, .... च्या संग

> झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी, शोभून दिसते सर्वांमध्ये, ..... व माझी जोडी

> मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, .... च्याच प्रेमात पडतं

> मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,...मुळे कळला मला, जीवनाचा आनंद

> प्रेमाच्या ओलाव्याने, दुःखं कोरडी झाली….माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली

> गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद….च्या नावातच, सामावलाय माझा आनंद

> द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान…चे नाव घेतो, ऐका देऊन कान

> जुईच्या वेलीवर लागली, सुगंधी नाजूक फुले … ने दिली मला, दोन गोड  मुले

> आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ………नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

> चंद्र आहे रोहिणीचा सोबती,………माझी जीवन साथी.

> सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.

> आंबेवनात कोकीळा गाते गोड, ………आहे माझ्या तळहाताचा फोड.

> मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ………वर जडली माझी माया.

> ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

> काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,………जीवनात मला आहे आनंद.

> कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात,………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.

> वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,…….. आहे माझी सर्वात सुंदर.

> श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

> इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,………नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

> कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,……..च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

> जगाला सुवास देत उमलती कळी,………नाव घेतो………वेळी.

> देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,………. मुळे झाले संसाराचे नंदनवन.

> सत्कर्याची करावी नेहमीच पूजा, ….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.

> ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास, ….. झाली माझी लाडकी राणी खास.

> रोम इज द स्वीट आर्ट, ….. इज इन माय हार्ट.

> घर असावं नेहमी क्लीन अँड नेट, …… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.

> सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा….. चा सहवास मला नेहमीच हवा.

> स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली..….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.

> पुण्याहून धडक आली डेक्कन क्वीन….. झाली माझी साताजन्माची क्वीन.

> सोन्याचा कप आणि चांदीची बशी, ….. माझी आहे जणू काही उर्वशी.

> पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा, ….. च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.

> लग्न ठरलं, हळद लागली, हातावर रेखली मेहंदी, ….. च्या सौंदर्याने मी झालो जायबंदी.

> असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते, ….. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते.

> काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या, ….. शी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कण्या.

> दारातल्या मोगर्याचा चढवला मांडवावर वेल,….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.

> नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी, ….. च्या सहवासात रात्र झाली थोडी.

> नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल, ….. च्या सौंदर्याचे पडली मला भूल.

> एरवी सारखा बडबडतो, उडतो जसा फुटाना, ….. च नाव घ्यायला आठवत नाही उखाणा.

> नाव घ्या, नाव घ्या, नावात काय? ….. ला म्हटलं तू तर माझी ऐश्वर्या राय.

> श्री कृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी, ….. रानी माझी आहे अगदी हसरी.

> नाव घे ,नाव घे ,आग्रह करू नका,….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

> नाव घे नाव घे करू नका ठणाना….. च नाव घ्यायला सुचत नाहीये उखाणा.

> उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी….. च नाव घ्यायला झालो मी राजी.

> नावामध्ये आहे काय ? नका हट्ट धरू, माझा उखाणा जुळत नाही……..काय ग करू

> वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती, …………चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती

> लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा, ………….. च्या रूपापुढे अप्सरेचा ढळेल तोरा

> खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड, ………च्या रूपात नाही कुठेच खोड


Comedy Funny Marathi Ukhane for Male (Groom)

> माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप….. ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप

> बाजारातून घेऊन येतो.... ताजी ताजी….शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी

> ....ची बाटली आणि काचेचे ग्लास …सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

> गुलाबाचे फूल, वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु असते, __ चे गुलूगुलू

> उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही, कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही

> हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू ….  एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू

> गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू….चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

> लिपस्टिक वाढवते ......ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

> मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…. भाव देत नाही, कित्ती केले ट्राय

> नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट, चल ...... पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

> चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी….माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी

> शंकराच्या पिंडीला, नागाचा वेढा…. माझी म्हैस आणि मी तिचा रेडा

> डास चावला की, येते अंगाला खाज….चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज

>....व माझी लव स्टोरी एकदम सच्ची, गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची

> उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार, आंघोळ कर...., नाहीतर लोकं होतील पसार

> पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.

> गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.

> नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री

> एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

> कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.

> सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,

> अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.

> दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

> श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.

> भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

> आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, …चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,

> भाजीत भाजी मेथीची, … माझी प्रितीची,

> दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

> चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, … रावाच्या जीवावर … मारते मौजा.

> सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.

> हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि….किती टिंगू

> चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ...चं नाव घेतो पुढचं नाही पाठ

> कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव….चे नाव घेतो, बंद करा टिव टिव

> भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची

> बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून, व्हायचे आधी जागरण, आता मी खुश, पोटही खुश, ....निघाली सुगरण

> केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ….चं नाव घेतो, पिडू नका वायफळ

> ....भेटल्यापासून, झालो मी पूर्ण, पोटांच्या तक्रारीसाठी, आजच घ्या कायम चूर्ण

> काश्मीरहून आणलाय, सुंदर रेशमी रुमाल…. बरोबर असले की, कशाला हवा हमाल?

> बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून….शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

> चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे,  घास भरवतो मरतुकडे तोंड कर इकडे

> गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डोलू, दिवसभर सुरू असते....चे गुलूगुलू

> नव्या कोऱ्या रूळांवर ट्रेन धावते फास्ट, चल पिक्चरला सीट पकडू लास्ट

> अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड, हसते गोड पण डोळे वटारायची भारीच तिला खोड

> जीवन आहे एक अनमोल ठेवा….आणते नेहमी सुकामेवा

> चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा,  आमची ही म्हैस तर मी आहे रेडा

>. ...बिल्डिंग, घराला लावली घंटी, ...माझी बबली आणि मी तिचा बंटी

> गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,....माझी बायको आहे मोठी लुच्ची

> झेंडूचे फूल हलते डुलूडूलू, आमची ही मात्र दिसते डुकराचे पिलू

> वड्यात वडा बटाटावडा, ...ला मारला खडा म्हणूनच जमला जोडा

> 5 + 4 इज इक्वल टू नाईन, ...इज माईन

> स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल,....एकदम ब्युटीफूल

> साखरेचे पोते सुईने उसवले,....मला पावडर लावून फसवले

> डाळीत डाळ, तुरीची डाळ…च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ

> बशीत बशी कप बशी,……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.

> पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा, ….. चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा.

> भक्ती तेथे भाव ,भाव तेथे कविता, ….. च्या नावाचा जप करतो येता-जाता.

> श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून, ….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.

> लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून, ….. ला पडली भूल आली प्रेमात फसून.

> संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा, ….. ला म्हटलं चल पिक्चरला, लवकर कर जामानिमा.

> मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस,….. आज झाली माझी मिसेस.

> अहो, वाट पहात होतो कितीतरी दिवस, दाद देईना कसली, पण आज मात्र….. माझ्या जाळ्यात फसली.

> घटका गेली पळे गेली राम का हो म्हणाना,………..चे नाव घेतो, थांबवा आता ठणाणा

> विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या भरून, नाव घेण्याची भुणभुण उरली टाकतो …….. म्हणून

> हुंडा नाही, करणी नाही, नाही पोषाख दिला, माझ्या …………माहेरच्यांनी मला ‘मामा’ च केला

> हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट, ………..च्या हौशीसाठी केला सगळा थाट