Marathi Ukhane for Female

Romantic Marathi Ukhane for Female (Bride)

> माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने, ….राव आहेत सोबत,  मग मला कशाचे उणे 

> सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात, ….रावांचे नाव घेते, ….च्या घरात 

> रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा, ….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा 

> संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला, ...रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

> आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा, ….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

> संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी, ….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी 

> गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी, ….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी 

> पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे, ...रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे

> दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी, ...रावांचे नाव घेते , तुम्हा सर्वांसाठी!

> मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर,...रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर

> सासरची छाया,  माहरेची माया,….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया

> हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,...रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी 

> पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी....रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

> सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,...रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

> चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,...रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा 

> गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं...रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं

> चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,...रावांचे नाव घेते देवापुढे

> शेल्याशेल्याची बांधली गाठ...रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ 

> बारीक मणी घरभर पसरले...रावांसाठी मी माहेर विसरले 

> इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून...रावांचं नाव घेते….ची सून 

> देवापुढे लावली समईची जोडी,….रावांमुळे आली आयुष्याची गोडी 

> निळ्या आकाशात चमचमते तारे,….रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे 

> आईने केले संस्कार, बाबांनी बनवले सक्षम….रावांच्या साथीने संसार होईल भक्कम 

> श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती...रावांच्या संसारात, मिळो सुखशांती 

> मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ….रावांमुळे आला जीवनाला अर्थ 

> आतून मऊ, बाहेर काटेरी साल….दिसले खडूस तरी मन मात्र विशाल 

> गार गार माठामधले,  पाणी ताजे ताजे….राव झाले माझ्या मनाचे राजे 

> मनी माझ्या संसाराची आहे आस….तू फक्त गोड हास 

> माझी आणि ….रावांची जमली जोडी, सर्वांनी येऊन वाढवा लग्नाची गोडी 

> नव्या कोऱ्या रूळांवर, ट्रेन धावते एकमद फास्ट...राव चला पिक्चरला, पकडू सीट लास्ट 

> पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

> गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

> घातली मी वरमाला हसले …. राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली. 

> वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, …. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल. 

> मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …. बरोबर संसार करीन सुखाचा. 

> चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …. चं नाव घेते देवापुढे. 

> गावठी गुलाबाला सुगंध सुवास, …. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.  

> हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, …. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल. 

> मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, …. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

> सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,.......... रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.

> नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, .......रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

> कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट.... नाव घेते बांधते......... च्या लग्नाची गाठ.

> वाट जीवनाची झाली सुखद आनंदी .... च्या सवे चालते मी सप्तपदी... !!

> चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, ----- रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

> लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, ..........चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

> सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!

> हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, …. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!

> शेल्या शेल्याची बांधली गाठ, .......नाव मला तोंडपाठ.

> नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते..... च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

> कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 

> यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब ----- चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

> गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ........ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 

> वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ..... चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

> बारीक मणी घरभर पसरले, …… साठी माहेर विसरले. 

> पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, ….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

> लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 

> चंदनी पानात मुग्ध कळी हसली, …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. 

> रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 

> परसात अंगण, अंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस.

> रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, …. च्या साथीने आदर्श संसार करीन. 

> हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. 

> इंग्रजीत म्हणतात मून, …. चं नाव घेते …. ची सून. 

> सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात. …. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. 

> आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, …. चं नाव घेते कुंकू लावून. 

> चांदीच्या ताटात गाजराचा हलवा. ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. 

> चांदीचे जोडवे पतीची खूण, …. रावांचे नाव घेते …. ची सून. 

> आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 

> आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर. 

> बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।,,,,,,,,,,रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

> वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!

> अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर, …. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!


Comedy Funny Marathi Ukhane for Female (Bride)

 > बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या,...रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या 

> पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक, आमचे….राव तर आहेत खूपच नाजूक 

> इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,….राव परतले नाहीत, कुठे पिऊन पडलेत की काय?

> रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कल, आमचे...राव आहेत हँडसम, पण डोक्यावर मात्र टक्कल 

> नाव घ्या नाव,  सगळे झाले गोळा,….रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा 

> पाव शेर रवा, पाव शेर खवा,….रावांचे नाव घेते, समोर हजार रूपये ठेवा 

> सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून, ...रावांचे नाव घेते पाच गडी राखून 

> चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा, मी आहे म्हैस तर...राव आहेत रेडा 

> उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,….रावांचे नाव काय घेऊ...कपाळ???

> एक होती चिऊ,  एक होता काऊ,….रावांचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ

> गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव,....राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!

> विड्याच्या पानात, पावशेर कात….रावांच्या कमरेत, घातली गाढवाने लाथ

> चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू.…रावांना पाहताच, कुत्री लागतात भुंकू

> काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज….नी वजन काटा मोडलाय आज

> चांदीच्या ताटात, __चे पेढे.… माझे हुशार, बाकी सगळे वेडे!

> बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड  गोड …. रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.

> हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ….रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ

> मोगऱ्याच्या झाडावर, फुलल्या होत्या कळ्या…. रावांचे दात म्हणजे, मोडक्या दरवाज्याच्या फळ्या

> जुन्या भिंतीवर लावलं, नवीन नवीन कॅलेंडर…. रावांचे पोट म्हणजे, भरलेले गॅस सिलेंडर

> रेशमी सदर्याला, प्लास्टीकचे बक्कल…रावांना, तिशीतच पडले टक्कल

> कृष्णाच्या बासरीने होती, गोपिकांची मने घायाळ…. रावांची दाढी म्हणजे, सिंहाची जणू आयाळ